इलेक्ट्रॉनिक मेल (ई-मेल) ही बाब अनेकांच्या आज सवयीची झालीय. १९७१ मध्ये रे टॉम्लिन्सन यांनी हे तंत्रज्ञान शोधून काढलं. सुरवातीला त्यांच्या या तंत्रज्ञानाची दखल घेतली गेली नाही; पण नंतर मात्र अनेक जण ई-मेलचा वापर करू लागले. मात्र हा प्रवास सहज झालेला नाही. अनेक जणांच्या योगदानातून ई-मेलचं आजचं रूप तयार झालंय. या तंत्रज्ञानाचे जनक टॉम्लिन्सन यांचं नुकतचं ( ५ मार्च) निधन झालं. त्यानिमित्त...
इलेकट्रॉनिक मेल (ई-मेल) हे तंत्रज्ञान उदयाला येण्यापूर्वी ‘आर्पानेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंटरनेटचा वापर दोन संगणकांमधली देवाणघेवाण या एकाच गोष्टीसाठी केला जाई. पण ही देवाणघेवाण दोन संगणकांमध्येच व्हावी असं काही नाही; या तंत्रज्ञानानं दोन माणसांमध्येसुद्धा संवाद होऊ शकतो अशी टूम निघाली. ई-मेलचं तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांच्या वापराच्या दृष्टीनं सुरवातीला क्लिष्ट आणि कटकटीचं होतं पण त्यात सुधारणा होत गेल्या आणि नवनव्या पद्धती निघाल्या. जगातली पहिली आधुनिक स्वरूपाची ई-मेल बीबीएन कंपनीत काम करणाऱ्या रे टॉम्लिन्सन यांनी १९७१ मध्ये ऑक्टोबर महिन्यात पाठवली असं मानलं जातं. त्यांनीच इमेलच्या तंत्रज्ञानाला जन्म दिला. न्यूयॉर्कमध्ये १९४१ मध्ये टॉम्लिन्सन यांचा जन्म झाला. १९६३ मध्ये विज्ञान शाखेतलं पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी पुढं एमआयटीत आपलं उच्चशिक्षणही पूर्ण केलं. १९६७ मध्ये ते बीबीएन कंपनीत रुजू झाले. तिथं त्यांनी टेलनेट तसंच तत्सम प्रकारच्या तंत्रज्ञानांवर काम केलं. त्यानंतर आर्पानेटवर एकीकडून दुसरीकडं संगणकाच्या फाईल्स पाठवू शकणारं तंत्रज्ञान बनवायची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली. हे काम करत असतानाच आर्पानेटचा वापर करून एकीकडून दुसरीकडं संदेश किंवा निरोप पाठवायची युक्ती त्याला सुचली. त्यावर त्यानं काम केलं आणि त्यातून ई-मेलचा जन्म झाला. गंमत म्हणजे जेव्हा टॉम्लिन्सन यांनी आपल्या एका सहकाऱ्याला आपल्या या कामाविषयी सांगितलं तेव्हा त्यांना मिळालेला प्रतिसाद अतिशय थंड होता. ई-मेलचा वापर कुणी करेल असं त्या सहकाऱ्याला अजिबातच वाटलं नाही. तसंच टॉम्लिन्सन नसत्या उचापाती करत असल्याचं आपलं मत असल्याचंही त्या सहकाऱ्यानं टॉम्लिन्सनला सुनावलं. कहर म्हणजे ई-मेलचा शोध लागून अनेक वर्षे उलटून गेल्यावर टॉम्लिन्सन यांनी ई-मेलचा शोध लावला असल्याचं जगाच्या लक्षात आलं.

बीबीएन कंपनीत काम करताना रे टॉम्लिन्सन यानं ‘ई-मेल’चं तंत्रज्ञान विकसित केलं.
आज आपण आपल्या संगणकाच्या कीबोर्डवरच्या @ या चिन्हाचा वापर इमेलच्या ॲड्रेसमध्ये अगदी सहजपणे करतो. या चिन्हाचा वापर करायची युक्तीही टॉम्लिन्सन यांचीच होती. पण या चिन्हाचा शोध मात्र आपण लावलेला नसल्याचं ते प्रांजळपणे मान्य करतात. या चिन्हाची गंमत म्हणजे अनेक भाषांमध्ये ते वेगवेगळ्या अर्थानं वापरलं जातं. स्वीडिश भाषेत त्याचे अनेक अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ ‘हत्तीचा कान’ असा होतो. कदाचित हे चिन्ह हत्तीच्या कानासारखं दिसतं. म्हणून तसं म्हटलं जात असावं फ्रेंच भाषेत या चिन्हाचा अर्थ ‘अज्ञात गोष्ट’ असा आहे. डच भाषेत हे चिन्ह ‘माकडाची शेपटी’ या अर्थानं वापरलं जातं. इटालियन भाषेत त्याचा अर्थ ‘गोगलगाय’ असा होतो. हे चिन्ह पोटात पाय घेऊन बसलेल्या गोगलगायीसारखं दिसत असल्यामुळे असं असावं. इंग्रजी भाषेत मात्र या शब्दाचा वापर ‘एखाद्या गोष्टीचा दर’ अशा अर्थानं होतो. उदाहरणार्थ ५ पेन्सिली @ प्रत्येकी ५ रुपये बरोबर एकूण २५ रुपये असं मानलं जातं. टॉम्लिन्सननं हे चिन्ह ई-मेलमध्ये माणसाचं नाव आणि त्याच्या काम करायच्या ठिकाणाचं किंवा त्याला ई-मेलची सुविधा पुरवणाऱ्या कंपनीचं नाव जोडण्यासाठी वापरलं. उदाहरणार्थ akahate आणि Gmail.com जोडून akahate@gmail.com असा ई-मेल ॲड्रेस किंवा ई-मेल आयडी तयार होतो. एका मुलाखतीत ई-मेलचा शोध आपल्याला १९७२ मध्ये लागला असं टॉम्लिन्सन यांनी म्हटलं होतं; पण नंतर त्यांनीच ही माहिती चुकीची असून, १९७१ मध्ये आपण इमेलच्या वापर प्रथम केला असं सांगितलं.
१९७१ ते १९७५ या काळात इंटरनेटची मूळ रचना तयार करणाऱ्या आर्पा कंपनीचा संचालक आणि भौतिकशास्त्रात प्रवीण असलेला स्टीफन ल्युकासिक हा इमेलचा मोठा चाहताच बनला. त्यामुळं इमेलची लोकप्रियता वाढतच गेली. १९५० च्या दशकात बीबीएन कंपनी आणि एमआयटी इथं आपल्या कारकीर्दीची सुरवात झाल्यानं ल्युकासिकला संगणकांविषची खूप कुतूहल वाटायचं. त्यामुळं आर्पामध्ये असतानाही संगणकांविषयीच्या संशोधनाच्या कामाला निधी उपलब्ध करून देण्यात तो नेहमी पुढे असे. त्याला सतत आपल्या कार्यालयात फेऱ्या मारून सहकाऱ्यांशी गप्पा मारायला आवडायचं. यातूनच ल्युकासिकनं वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान पुढं नेलं.
ई-मेलचा शोध लागल्यावर सुरवातीच्या काळात वेगवेगळ्या गमतीजमती घडायच्या. लोकांना आपण संगणक वापरून एकमेकांना संदेश पाठवू शकतो याचं इतकं अप्रुप वाटायचं की ते कित्येकदा काहीही कारण नसताना एकमेकांना ई-मेल्स पाठवायचे, त्यात त्यांना थ्रिल वाटायचं. काही माणसांना मात्र अशा प्रकारे संगणकाच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना संदेश किंवा निरोप पाठवणं अजिबात आवडायचं नाही. त्यामुळं कधीकधी एखाद्या माणसानं आपल्या सहकाऱ्याला ई-मेलनं प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर द्यायला तो सहकारी सरळ उठून पहिल्या माणसाच्या टेबलापाशी येई. थोडक्यात म्हणजे अनेक जणांच्या दृष्टीनं ई-मेल हा एक ‘कल्चर शॉक’च होता.
त्या काळात अजून पर्सनल कम्प्युटरसुद्धा अस्तित्वात आलेला नसल्यामुळं लॅपटॉप, टॅब्लेट पीसी, मोबाईल हे सगळं कुणाच्या स्वप्नातसुद्धा नसावेत. पण ल्युकासिककडं साडेतेरा किलो वजनाचा एक ‘पोर्टेबल’ संगणक होता. सगळीकडे प्रवास करत असताना ल्युकासिक आपल्याबरोबर हे धूड घेऊन जायचा. तसंच या जड संगणकाला ‘अकौस्टिक कप्लर’ नावाचं यंत्र जोडून तो जाता-येता आपल्याला आलेल्या ई-मेल्स वाचायचा आणि त्यांना तिथून उत्तरंही लिहायचा. त्या काळाच्या मानानं हा सगळा प्रकार एकदम अत्याधुनिकच होता असं म्हणायला हवं. ई-मेलच्या सुविधेमुळं जिथं असेल तिथून ल्युकासिकला आर्पामधल्या कामाच्या प्रगतीविषयी जाणून घेता येई. ई-मेलमुळं ल्युकासिक इतका प्रभावित झाला की त्यानं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना ई-मेलचं तंत्रज्ञान वापरायचे आदेश देऊन टाकले. त्या सहकाऱ्यांनी आपल्या हाताखालच्या माणसांना तेच सांगितलं. असं करत करत आर्पामध्ये ई-मेलचा वापर चांगलाच वाढला. ल्युकासिक त्याचा एक सहकारी रॉबर्टसला कुठलीही माहिती विचारली की तो भराभर ती ल्युकासिकला पुरवायचा. त्यामुळं ल्युकासिक त्याच्यावर चांगल्यापैकी अवलंबून राहू शके. पण तो हे सगळं कसं जमवून आणतो याविषयी ल्युकासिकला विलक्षण कुतूहल वाटत असे. यामुळं त्यानं एकदा रॉबर्टसच्या कामाच्या पद्धतीचा अभ्यास केला. ल्युकासिकनं कुठलीही माहिती मागितल्यावर रॉबर्टस आपल्या सहकाऱ्यांना संबंधित विषयावरच्या ई-मेल्स तातडीनं पाठवायचा आणि त्यांनी उत्तरं पाठवली की ती सगळी माहिती एकत्र करून ल्युकासिकला लगेचच पाठवून द्यायचा. त्यामुळे रॉबर्टसचं काम विलक्षण वेगानं होतं ही गोष्ट ल्युकासिकच्या लक्षात आली.
नंतर १९७३ मध्ये ल्युकासिकनं काही जणांना आर्पानेटवर फाईल्स तसंच ई-मेल्स अशी माहिती किती प्रमाणात पाठवली जाते याचा अभ्यास करायला सांगितलं. या अभ्यासातून आर्पानेटवरच्या संदेशवहनामधली ७५ टक्के माहिती इमेलच्या संदेशांशी संबंधित असल्याचं दिसून आलं. आता ई-मेल्स पाठवायचं काम तसं सोपं झालं होतं. पण आपल्याला आलेल्या ई-मेल्स वाचणं आणि त्यांना उत्तर देणं हे काम मात्र अजूनही अवघडच होतं. कारण आपल्याला समजा दोन ई-मेल्स आलेल्या असतील तर त्या सलग, कुठलंही फॉरमॅटिंग न होता संगणकाच्या स्क्रीनवर किंवा प्रिंटरवर उमटायच्या. त्यामुळं इमेल वाचताना अक्षरांचा पूरच आला आहे की काय असं वाटायचं. तसंच समजा आपल्याला आलेली ई-मेल वाचण्यात रस नसेल आणि ती न वाचता दुसरी ई-मेल आपल्याला वाचायची असेल तर तशी सोयसुद्धा नव्हती. पहिल्या ई-मेलपासूनच वाचनाला सुरवात करणं भाग असे. तसंच आलेल्या ई-मेल्सना उत्तरं लिहिण्यासाठी आता जसं ‘रिप्लाय’चं बटन असतं तसं त्या काळी नसायचं. त्यामुळे आलेल्या ई-मेल्सना उत्तरं लिहिण्यासाठी परत एक नवी इमेल लिहावी लागे. या सगळ्यामुळे ल्युकासिक जरा वैतागूनच गेला. त्यानं नेहमीप्रमाणे रॉबर्टसला यावर उपाय करायला सांगितलं. नेहमीच्याच सफाईनं रॉबर्टसनं काही खटाटोप करून नको असलेल्या इमेल्स डिलिट करणं, आलेल्या इमेल्सची विभागणी करणं इत्यादी सोयी असलेला प्रोग्रॅम एका सहकाऱ्याकडून लिहून घेतला. ई-मेल्सच्या जंजाळाशी सामना करण्यासाठी लिहिण्यात आलेला हा पहिलाच प्रोग्रॅम असावा. त्यातून स्फूर्ती घेऊन असे आणखी प्रोग्रॅम्स इतरांनी लिहिले. इमेलच्या संदर्भातले नियम ठरवताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळ व्हायचे. एका माणसानं ई-मेल ॲड्रेसमध्ये @ हे चिन्ह टाकण्याला विरोध केला.
त्याऐवजी दुसरं कुठलं तरी चिन्ह वापरा असं त्या माणसाचं म्हणणं होतं. दुसऱ्या एका माणसानं हेच चिन्ह वापरलं पाहिजे असा आग्रह धरला खरा; पण हे चिन्ह माणसाचं नाव आणि वेबसाईटचं किंवा कंपनीचं नाव यांच्यामध्ये न येता वेगळीकडेच असलं पाहिजे असं मत मांडलं. त्यातला आणखी एक गोंधळ म्हणजे ‘मल्टिक्स’ नावाच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये @ या चिन्हाचा वापर ज्या ओळीवर सध्या माणूस टायपिंग करत असेल त्या ओळीतला उरलेला सगळा मजकूर काढून टाकण्यासाठी व्हायचा. त्यामुळे मल्टिक्स ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या संगणकाचा वापर करून कुणी दुसऱ्या कुणाला ई-मेल लिहीत असेल तर त्यासाठी ई-मेल ॲड्रेस टाईप करत असताना कीबोर्डवर @ हे चिन्ह टाईप केलं की त्या ओळीतला पुढचा सगळा मजकूर गायब केला पाहिजे असा अर्थ लावला जायचा. त्यामुळं ई-मेल ॲड्रेस पूर्णपणे टाईप करणं शक्यच व्हायचं नाही. उदाहरणार्थ समजा ई-मेल लिहिणाऱ्या माणसाला akahate@gmail.com या ई-मेल ॲड्रेसवर इमेल पाठवायची असेल तर तो माणूस हा ई-मेल ॲड्रेस टाईप करायला लागेल. पण त्यानं हे काम करताना @ हे चिन्ह टाइप करताच त्या माणसाला या चिन्हानंतरचा मजकूर टाइप करणं शक्यच व्हायचं नाही. कारण त्यानं या चिन्हानंतर कोणताही मजकूर टाइप केला की संगणक तो मजकूर लगेचच पुसून टाकायचा. यामुळे मल्टिक्स ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर ई-मेल लिहिण्यासाठी करणारे लोक मनातून इमेलच्या जनकाला म्हणजेच टॉम्लिनसला खूप दूषणं द्यायचे.
ई-मेल अस्तित्वात येऊन अनेक वर्षे झालेली असली तरी तिचा मोठ्या प्रमाणावर वापर नंतरच सुरू झाला. लोक इमेल किती वेळात वाचातत आणि तिला किती पटकन उत्तर देतात हे बघण्यासाठी डेव्ह क्रॉकरनं एकदा एक छोटा प्रयोग केला. त्यानं संध्याकाळी पाच वाजता सुमारे १३० जणांना एक इमेल पाठवून या ई-मेलचं उत्तर मागितलं. त्या इमेलमधल्या मजकुराला तसं काही महत्त्व नव्हतं. यातून क्रॉकरनं काढलेला निष्कर्ष तसा धक्कादायकच होता. कारण इमेल पाठवून जेमतेम दीड तास उलटल्यावर ७ जणांनी त्याच्या ई-मेलला उत्तर पाठवलं होतं. चोवीस तासांमध्ये तब्बल २८ जणांचं उत्तर आलं होतं. आजच्या युगात काही सेकंदांमध्ये किंवा मिनिटांमध्येच कदाचित एवढी उत्तरं येतील. पण १९८० च्याही आधी इतक्या जणांनी ई-मेल वाचून इतक्या लवकर उत्तर लिहिणं हे ई-मेलच्या येऊ घातलेल्या युगाची नांदी सांगणारंच होतं.
ई-मेलचा वापर वाढला तसा या माध्यमात आणखी जान ओतण्याचा प्रयत्न काही जणांनी सुरू केला. ई-मेलमधला मजकूर खूपच कोरडा आणि तुटका वाटतो असं केव्हिन मॅकेंझी या इमेलचा वापर नव्यानं सुरू केलेल्या माणसाला वाटायचं. त्यामुळे मॅकेंझीनं इमेलच्या माध्यमातून माणसाच्या भावना, हालचाली, त्याचे हावभाव या गोष्टी पोचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं ठरवलं. त्यासाठी १२ एप्रिल १९७९ या दिवशी मॅकेझीनं ई-मेलमध्ये नेहमीच्या भाषेत समाविष्ट नसलेली काही चिन्हं वापरावीत अशी सूचना केली. नमुन्यादाखल त्यानं ः-) हे चिन्ह हसरी मुद्रा दाखवण्यासाठी वापरावी असं सुचवलं. म्हणजेच इमेल लिहिणाऱ्या माणसाला आपल्याला हसू येत असल्याचं पलीकडच्या माणसाला कळवायचं असेल तर तो हे चिन्ह वापरेल. या संदर्भात त्यानं ‘रीडर्स डायजेस्ट’ या मासिकात वाचलेल्या एका लेखाचाही संदर्भ घेतला होता. मॅकेंझीनं आपली ही सूचना ई-मेलच्या ‘डिस्कशन ग्रुप’वर मांडली. एका तासाभरातच त्याला ‘तुझी सूचना थोडीशी बालिश प्रकारची वाटत असली, तरी ती अगदीच मूर्खपणाची नाही’ अशी प्रतिक्रिया मिळाली. एका माणसानं मॅकेंझीचं म्हणणं साफ खोडून काढताना विल्यम शेक्सपियरचा दाखला दिला. फक्त शब्दांची जादू वापरून शेक्सपियर सगळ्या प्रकारच्या प्रसंगांचं आणि भावनांचं वर्णन समर्थपणे करू शकत होता तर आपल्याला ही चिन्हं कशाला हवीत असा त्या माणसाचा सवाल होता. पण लवकरच हा विरोध मावळला आणि अनेक लोक आपल्या इमेल्समध्ये मजकुराबरोबरच या चिन्हांचा वापर करायला लागले. त्यात प्रामुख्यानं ः-) म्हणजे हसरी मुद्रा, ;-) म्हणजे डोळा मारल्यासारखी खूण अशी चिन्हं वापरली जायची. अशा प्रकारच्या चिन्हाला आता ‘स्माईली’ किंवा ‘इमोटिकॉन’ म्हणून ओळखलं जातं. त्यामधला ‘इमोटिकॉन’ हा शब्द ‘इमोशन’ आणि ‘आयकन’ यांच्या एकत्रीकरणातून तयार झाला आहे. म्हणजेच ‘भावना व्यक्त करण्यासाठीचं चिन्ह’ असा त्याचा अर्थ होतो. आजच्या व्यवहारात अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या ई-मेलचा जनक आता जगात नाही !

No comments:
Post a Comment