नॉम पे
जुळी मुले झाली, पण त्या दोघांचे वडील वेगवेगळे हे ऐकायला विचित्र वाटतं ना... वैद्यकीय दृष्ट्याही हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण हे शक्य झाले व्हिएतनामच्या होआ बिन्थ प्रांतात. येथील जुळ्या मुलांपैकी एकाचे जाड आणि कुरळे केस आहेत तर दुसर्या मुलाचे केस पातळ आणि सरळ आहेत.
हॉस्पिटलने आपले एक मूल बदलले आहे, असे या मुलांच्या आई आणि वडिलांनी वाटत होते, त्यामुळे त्यांनी त्याची डीएनए चाचणी केली. त्यात ही धक्कादायक बाब समोर आल्याचे व्हिएतनाम न्यूजने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ही डीएनए टेस्ट हानोईच्या सेंटरमध्ये करण्यात आले. त्यात निष्पन्न झाले की या दोघांची आई एक आहे. तर 34 वर्षीय वडिलांना समजले की, या दोघांपैकी केवळ एकच मुलगा आपला आहे. बायपॅट्रनल मुलं ही खूप दुर्मीळ घटना आहे. अशा प्रकारे ही पहिला घटना आहे जी व्हिएतनाममध्ये घडली आहे. महिलेच्या गर्भातील अंडाणू ही 12 ते 48 तास जगतात. तर पुरुषाचे शुक्राणू हे 10 दिवस जगू शकतात. त्यामुळे या महिलेने दोन व्यक्तींशी संभोग केल्यामुळे दोन अंडाणू फलित झाली आणि त्यातून दोन जुळे मुले जन्माला आली.
- See more at: http://www.pudhari.com/news/visvsanchar/22568.html#sthash.zSvEDqZX.dpuf
No comments:
Post a Comment